दापोली तालुक्यात गेल्या ५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, विजेचे खांब पडणे आणि वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दाभोळ गावात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
५ जुलैपासून खंडित झालेला वीजपुरवठा ६ जुलैभर सुरळीत होऊ शकला नाही. आज, ७ जुलै रोजी सकाळपर्यंतही दाभोळ गाव अंधारातच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट सेवा, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले तरी शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे.
दरम्यान, महावितरणचे कर्मचारी प्रतिकूल हवामानातही वीजवाहिन्या आणि खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र दाभोळसह परिसरातील नागरिकांना अद्याप वीजपुरवठा सुरू न झाल्याने त्यांच्या अडचणी कायम आहेत. ग्रामस्थांनी प्रशासन आणि महावितरणने तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













