Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दाभोळ-दापोली रोडवर एसटी बस आणि बाईकचा भीषण अपघात, बाईक चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

दाभोळ-दापोली रोडवर एसटी बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.


या अपघातामध्ये तहसीन मतरोजी वय 35 राहणार दाभोळ वनकर मोहल्ला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

दाभोळ वरून दापोलीकडे जात असताना उंबर्ले येथील उतारातमध्ये एसटी बस आणि सुझुकी बर्गमेन बाईकचा भीषण अपघात झाला आहे. तहसीन मतरोजी यांच्यासोबत त्यांचे मामा शमशुद्दीन दांडेकर हे देखील होते त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांना दापोली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दापोलीवरून दाभोळला जाणारी ११ ची एसटी बस उंबर्ले येथे येताच समोरून येणाऱ्या बाईकचची धडक बसून अपघात झाला आहे.

एसटी बस चालकाचं नाव एस आर मोरे आहे.पोलीस पंचनामा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *