Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : एसटी वाहकाला मारहाण, खेडमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड-दापोली मार्गावरील दस्तुरी गावाजवळ एसटी बसला साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एसटी वाहकाला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी Hyundai Creta चालक व एका महिलेविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी वाहक पंढरी खुशाल गायकवाड हे नियमित कर्तव्य बजावत असताना मंडणगड फाटा परिसरात एसटी बस थांबली होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या Hyundai Creta (क्र. एमएच ०८ एएन ५९८१) चालकाने अचानक आपले वाहन एसटी बससमोर आडवे लावले.

या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि एसटी चालक पर्शुराम नागरगोजे व संबंधित वाहनचालक यांच्यात वादाला सुरुवात झाली. वाद वाढत जाऊन शिवीगाळ व धक्काबुक्कीपर्यंत परिस्थिती पोहोचली.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाद मिटविण्याच्या उद्देशाने वाहक गायकवाड पुढे गेले. मात्र, यावेळी क्रेटा कारमधील महिलेने संतापाच्या भरात “तू मध्ये का आलास?” असे म्हणत गायकवाड यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्यांच्याशी शिवीगाळ केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या या प्रकारामुळे एसटी कर्मचारी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व मारहाण करणे आदी प्रकारांमुळे खेड पोलिसांनी संबंधित चालक व महिलेविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत असून, संबंधित आरोपींची चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे एसटी कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *