Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप; पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

संगमेश्वर : पाण्याच्या वादातून मारहाण, 7जणांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एकूण सात संशयित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) आणि संशयित आरोपी हे एकाच वाडीतील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. याच जुन्या वादाच्या रागातून १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वा.च्या सुमारास संशयित आरोपींनी फिर्यादीला गाठले.

यावेळी संशयित आरोपी सुरेश बाबू येडगे आणि पांडुरंग बाबू येडगे यांनी फिर्यादीला लाकडी काठीने मानेवर व पाठीत मारहाण केली. तसेच संशयित आरोपी सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे आणि इतर दोन-तीन जणांनी फिर्यादीला हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

मारहाण करत असताना फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर शंकर येडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९ (२), १९०, १९१(२), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एस. एस. कोलगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *