Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : पोलिसांकडून हर्णे येथील गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम

banner 468x60

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत दापोली पोलिसांनी हर्णे येथील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून एक आदर्श उपक्रम साकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वारसा स्थळांचे पावित्र्य आणि सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली.

banner 728x90

यावेळी दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळावी आणि त्यांचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.”

या मोहिमेदरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्र येत गड-किल्ल्यांच्या परिसरातील कचरा गोळा केला. तसेच वाढलेली झाडे-झुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच गड-किल्ल्यांच्या जतनाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

दापोली पोलिसांच्या या उपक्रमाला हर्णे परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक नागरिकांनीही स्वखुशीने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी योगदान दिले.

ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता इतिहासाप्रती आदर, सामाजिक जबाबदारी आणि वारसा संवर्धनाचा संदेश देणारी ठरली आहे. दापोली पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *