Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळुण : तरुणाची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

चिपळूणमध्ये नैराश्येपोटी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमोल दत्ताराम पंडव (३०, पोफळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर जितेंद्र नारायण पंडव यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. तिथपासून तो दारुच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. असे असताना नैराश्येपोटी त्याने राहत्या घराच्या बेडरूममधील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *