Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

चिपळूण : खेर्डी बाजारपेठेत मटका अड्ड्यावर छापा, एकावर गुन्हा

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ‘मिलन डे’ नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर चिपळूण पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डी बाजारपेठेतील जंगम वडापाव सेंटरच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विलास सखाराम मिरगल ( ५५, रा. खेर्डी बाजारपेठ) हा बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मिलन डे’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग शिवराम जवरत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ५ वाजता या ठिकाणी छापा टाकला. यावेळी विलास मिरगल हा मटक्याचे आकडे घेताना रंगेहाथ आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण १०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विलास मिरगल याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *