Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : दिव्यांगांच्या निधीचा दुरुपयोग, महिलेवर गुन्हा, चिपळूण नगर परिषदेत २०१९ मध्ये घडला होता प्रकार

banner 468x60

दिव्यांगांच्या ५ टक्के अनुदानातील घरकुल उभारणी योजनासाठीच्या निधीचा दुरुपयोग करून एका महिलेने चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर २०१९ रोजी घडला. या प्रकरणी शनिवारी त्या महिलेवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद चिपळूण नगर परिषदेतील सफाई कामगार संतोष शांताराम मोहिते (५०, रॉयलनगर, चिपळूण) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने चिपळूण नगर परिषदेने दिव्यांग ५ टक्के अनुदानातून निःसमर्थ व्यक्तींसाठी राखून ठेवलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठीच्या निधीसाठी ३१ जुलै २०१९ रोजी अर्ज केला होता. त्यानुसार त्या महिलेने १८ सप्टेंबर २०१९ रोजी मंजूर झालेली रक्कम स्वीकारली.

मात्र प्रत्यक्ष घर न बांधता त्या रकमेचा दुरुपयोग करून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ३ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे ‘तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *