Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : 91 व्या वर्षी पती-पत्नीने एकत्रच घेतला अखेरचा श्वास

banner 468x60

पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

banner 728x90

मनोहर श्रीपतराव सुर्वे (९१), संगीता मनोहर सुर्वे (८१, दोघेही निवळी) असे या पती-पत्नीचे नाव आहे.
मनोहर सुर्वे हे रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते तर संगीता सुर्वे या गृहिणी होत्या. त्यांनी आपले निधन झाल्यावर अंतिम विधी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीत व्हावेत असे यापूर्वीच लिहून ठेवले होते.

गेले काही दिवस मनोहर सुर्वे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. असे असताना त्यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पत्नी संगीता यांनीही काही मिनिटात जगाचा निरोप घेतला.


पुढे अंत्यसंस्काराबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांची मुले व नातेवाईकांनी सुर्वे दाम्पत्याची अंतिम इच्छा सर्वांना सांगितली. त्यानुसार सर्वांनी या दोघांवर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार वैकुंठरथातून मृतदेह येथे त्यांच्यावर आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *