चिपळूण : के.जी.एन. स्पोर्ट्स क्लबच्या चषकावर आर्यन सय्यदवाडी संघाने नाव कोरले

banner 468x60

शिरगाव: के.जी.एन. स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आई महाकाली संघावर मात करत आर्यन सय्यदवाडी संघाने विजेतेपद पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

banner 728x90

या स्पर्धेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाले, कुंभार्लीचे उपसरपंच संदीप कोलगे, माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ नारकर, अशोक गांधी, ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव, तसेच बशीर कडवेकर, अब्दुल रहेमान कडवेकर, महमद कडवेकर, बाबा कुंभार्लीकर, असलम कुंभार्लीकर, हमीद कुंभार्लीकर, इकबाल कडवेकर, सिकंदर शेख, रफीक शिकलगार, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा के.जी.एन. स्पोर्ट्स क्लबतर्फे सन्मान करण्यात आला.

प्रथम क्रमांक: आर्यन सय्यदवाडी
द्वितीय क्रमांक: आई महाकाली, शिरगाव
तृतीय क्रमांक: यंग बॉईज, अलोरे मोहल्ला
चतुर्थ क्रमांक: मुस्कान फायटर संघ

वैयक्तिक पुरस्कार:

उत्कृष्ट गोलंदाज: अजिंक्य इंदुलकर
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: मुबिन सय्यद
उत्कृष्ट फलंदाज: मोजम सय्यद

तसेच, चिपळूण तालुका डिजिटल परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेचे निवेदन अशोक लांबे यांनी केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी फैय्याज कडवेकर, हैदर कुंभार्लीकर, राज अहमद कडवेकर, आरिफ कडवेकर, सोहेल कडवेकर, अबुल कडवेकर, मजर कडवेकर, अजीम कुंभार्लीकर, इम्रान कुंभार्लीकर, सलीम कुंभार्लीकर, मुबारक कुंभार्लीकर, जाफर सकवारे, दानिश कुंभार्लीकर, साहिल शेख, नदीम शेख, नोमान शेख, शोएब कुंभार्लीकर, असद कुंभार्लीकर, फहद कुंभार्लीकर, फौजान कुंभार्लीकर, अमन शिकलगार, आयमान कुंभार्लीकर, आकिब कडवेकर, अबरार कडवेकर, मोहसीन कुंभार्लीकर, खलील सकवारे, समीर कुंभार्लीकर, नवाज कुंभार्लीकर, फिरोज कुंभार्लीकर, मुन्ना कुंभार्लीकर, हमाद कडवेकर, समीर कुटरेकर, हिदायत कडवेकर, फारुख कुंभार्लीकर, शहबाज कुंभार्लीकर, अली कडवेकर, बुकत्यार कडवेकर, कैस कडवेकर, हर्ष कुंभार्लीकर, नवाब कुंभार्लीकर, अतिक कडवेकर, अरमान कडवेकर, सफवान कुंभार्लीकर, कबीर कुटरेकर, हुजेफा कुंभार्लीकर, विलायत कुंभार्लीकर, अदनान सकवारे, जाकीब सकवारे, अरहान सकवारे, अर्सलान कडवेकर, हुस्नैन सकवारे, सैफान कुटरेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *