Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील चिरेखाणीतून 45 हजारांची केबल चोरी; तिघांविरोधात गुन्हा, एक आरोपी अटकेत

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीकच्या पिलवली फाटा, खांडोत्री परिसरातील एका चिरेखाणीतून तब्बल ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याचे दोन साथीदार रिक्षेसह फरार झाले आहेत.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चंद्रकांत सर्वे यांची खांडोत्री येथे चिरेखाण आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या चिरेखाणीतून पॉलिकॅब कंपनीची अंदाजे ३५० मीटर लांबीची तांब्याची केबल चोरीला गेली होती. चोरी गेलेल्या केबलमध्ये १०० मीटरचे तीन तुकडे आणि ५० मीटरचा एक तुकडा असा समावेश असून या मालाची एकूण किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.


या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, ६ मे २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शेजारील खाणीचे मालक दिनेश घडशी यांच्या मुकादमाला खाण परिसरात एक संशयित इसम फिरताना दिसला. संशय आल्याने त्याने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या पाठलागात कल्पेश दिलीप शिर्के (वय २९, रा. कालुस्ते बुद्रुक) हा संशयित ताब्यात घेण्यात आला.


मात्र, त्याच्यासोबत आलेले अन्य दोन साथीदार घटनास्थळावरून अप्पे रिक्षेसह पसार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीकडून पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

याप्रकरणी राजेश सर्वे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *