चिपळूण : सुमैया मुजाहिद मेयर हिची एलएल.एम.मध्ये उत्तुंग भरारी; 9.44 CGPA सह ‘Outstanding’ ग्रेड प्राप्त

banner 468x60

कोकणातील गोवळकोट येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व मुजाहिद मेयर यांच्या कन्या कु. सुमैया मुजाहिद मेयर हिने कायदा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कुटुंबासह संपूर्ण कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित एलएल.एम. (LL.M.) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत 9.44 CGPA गुणांसह First Class with Distinction प्राप्त केले आहे.


विशेष बाब म्हणजे सुमैयाला विद्यापीठाची सर्वोच्च मानली जाणारी ‘O (Outstanding)’ ग्रेड प्राप्त झाली आहे. ही ग्रेड A+ पेक्षाही उच्च दर्जाची मानली जात असल्याने तिच्या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि विषयावरील सखोल आकलनाच्या जोरावर तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.


सुमैयाने तृतीय सत्रात 9.50 SGPA तर चतुर्थ सत्रात 9.75 SGPA मिळवत आपल्या गुणवत्तेची सातत्यपूर्ण छाप पाडली. प्रत्येक सत्रात उत्कृष्ट गुण मिळवत तिने कायदा शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.


तिच्या या यशामुळे मेयर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून वडील मुजाहिद मेयर, आई तसेच कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांनी तिचे अभिनंदन करून भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


कोकणातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, यासाठी सुमैयाचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे गोवळकोट, चिपळूण आणि संपूर्ण कोकण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *