Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रामाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

चिपळूण : सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी सकाळी घडली.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


या घटनेत घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झालेली नाही.

वहाळ फाटा येथील रहिवासी शशिकांत आत्माराम वारे यांचे घर महमार्गालगतचे आहे. घरासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहने सर्व्हिस रोडने ये जा करतात.

बुधवारी चिपळूणकडून रत्नागिरीकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याकडेला येऊन नजीकच्या घरावर कलंडला.

घराची कौले व भिंतीचे नुकसान झाले. घटनेची सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. चौपदरीकरणामुळे महामार्ग जुन्या वस्तीला लागून जातो.

त्यातून रस्त्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घरांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *