दापोलीत नवीन मच्छी मार्केटजवळ नारळाचे झाड विजेच्या तारांवर कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

दापोली : दापोली येथील नवीन मच्छी मार्केट परिसरात रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना टळली. नवीन मच्छी मार्केटला लागून असलेल्या एका कंपाऊंडमधील भलेमोठे नारळाचे झाड अचानक विजेच्या तारांवर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नारळाचे झाड थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने मोठा आवाज झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. त्यावेळी परिसरात वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. संबंधित यंत्रणेकडून तातडीने दखल घेत पडलेले झाड हटविण्याचे तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *