दापोली : भरधाव झायलोची 72 वर्षीय महिलेला धडक कंबर, डोक्याला दुखापत, वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील खेर्डी बाग एसटी थांब्याजवळ भरधाव चारचाकी वाहनाने पायी चालत जाणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुगंधा लक्ष्मण भुवड (वय ७२, रा. खेर्डी मालवाडी, ता. दापोली) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी वाहनचालक सुनील रघुनाथ मोरे (वय ५७, रा. टांगर, ता. दापोली) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी सुगंधा भुवड या मंडणगड ते दापोली मार्गावरून पायी चालत जात होत्या. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास त्या खेर्डी बाग एसटी थांब्याजवळील रस्त्यावर आल्या असता मंडणगडच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा झायलो कारने त्यांना धडक दिली.

एमएच ०४ एफआर ५७०५ क्रमांकाची ही चारचाकी सुनील मोरे चालवत होते. वाहन वेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्यामुळे पायी जाणाऱ्या सुगंधा भुवड यांना धडक बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात त्यांच्या कंबरेला, बरगडीला, डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे.

या प्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.१४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाहनचालक सुनील रघुनाथ मोरे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या अपघाताचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *