Breaking News
चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू चिपळूण : सावर्डेतील मंगल कार्यालयातून 1 लाख 87 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला, लग्नसोहळ्यात चोरट्यांचा डाव! चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात

चिपळूण : कळंबस्ते फाट्यावर ‌‘हिट अँड रन‌’चा प्रकार

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबस्ते फाटा येथे भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे अपघात घडवून वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे.

ही घटना दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर मौजे कळंबस्ते फाटा येथे काळ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा चारचाकी गाडी हयगयीने व भरधाव वेगात चालवली जात होती.

या वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या निजामुद्दीन हसनअली शेख (36, रा. निरबाडे मोहल्ला, ता. चिपळूण) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात निजामुद्दीन शेख यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या

प्रकरणी जखमीचे चुलत भाऊ अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख (49, रा. निरबाडे मोहल्ला, चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दि. 2 जानेवारी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *