Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात, 15 जण जखमी

banner 468x60

चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. गुहागर मार्गावर मार्गताम्हाणे सुतारवाडी येथे टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन या अपघातामध्ये 13 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय.

मुंबई डोंबिवली येथून पर्यटकांना घेऊन चिपळूण मार्गे गुहागरच्या दिशेने जात असताना रस्त्यातच टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महिलेसह एका पुरुषाला गंभीर दुखापत झाली असुन 13 ते 14 जण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी रामपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहे स्थानिकांच्या मदतीने जखमीना मदत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *