चिपळूण : 37 वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा, कोकण बँकेचे फिरोज मालीम सेवानिवृत्त

banner 468x60

कोकण बँकेचे ज्येष्ठ कर्मचारी फिरोज मालीम यांनी तब्बल 37 वर्षांची प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


banner 728x90

या प्रसंगी कोकण बँक रत्नागिरीचे शाखा व्यवस्थापक अख्तर काजी, नासिर सांगळे, संगमेश्वर शाखेचे व्यवस्थापक गणेश कासार, आरडीसी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप माने, कोकण बँकेचे माजी संचालक जावेद मुजावर, माजी नगरसेवक कबीर कादरी, सफा गोटे, रईसा खडस, माजी नगरसेवक शमशुद्दीन सनगे, रोहिणी लाड तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात फिरोज मालीम यांच्या ३७ वर्षांच्या सेवाकाळातील प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, ग्राहकांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यांचा विशेष गौरव केला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत पुढील पिढीनेही सेवाभाव जपावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

यावेळी फिरोज मालीम यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी, अधिकारी आणि ग्राहकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निवृत्तीनंतरही समाजकार्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सक्रिय राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या समारंभाच्या शेवटी उपस्थितांनी फिरोज मालीम यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *