चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील शिगवणवाडीमध्ये शौचालय बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या प्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महेश शिगवण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धामणवणे येथील शिगवणवाडीमध्ये घडली. फिर्यादी महेश शिगवण (वय ३१) यांच्या घरात संडासाचे बांधकाम सुरू असताना आरोपी काशीराम गोपाळ शिगवण, धीरज काशीराम शिगवण तसेच दोन महिला तेथे आले. संबंधित बांधकामाला स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) असल्याचे सांगून त्यांनी काम थांबविण्याची मागणी केली.
यावेळी फिर्यादी पक्षाकडून स्टे ऑर्डर दाखविण्याची मागणी करण्यात आली. याच कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. फिर्यादीनुसार, या वादाचा राग मनात धरून आरोपी काशीराम शिगवण यांनी लोखंडी सळीने महेश शिगवण, त्यांच्या पती व सासरे यांच्यावर हल्ला केला. तसेच एका महिला आरोपीने फिर्यादीला काठीने मारहाण केली, तर धीरज शिगवण याने फिर्यादीच्या सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
याशिवाय आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत महेश वसंत शिगवण यांच्यासह अन्य सदस्य जखमी झाले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













