चिखलगाव : लोकसाधना चिखलगाव विद्यालयाचा दहावी निकाल 100 टक्के, नैतिक दुबळे प्रथम

banner 468x60

दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव यांनी एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ मध्ये शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही उज्ज्वल यश संपादन केले.

यंदाच्या परीक्षेत नैतिक मुकुंद दुबळे याने ८५.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दर्श दिलीप पाते हिने ८४.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर सुयश सुनिल गोसावी याने ८२.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच शर्वरी अजय मोहिते (७५.४०%), जय किशोर आंबेकर (७५.२०%), वेदिका गणपत ठोंबरे (७४.६०%), यश मधुकर खाडे (७४.२०%) आणि श्रुती रविंद्र आदवडे (७३.८०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *