Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी–करबुडे मार्गावर कारचा अपघात

banner 468x60

रत्नागिरी–करबुडे मार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. करबुडेहून रत्नागिरीकडे येताना एका उतारावर चालकाच्या डोळ्यावर थेट सूर्यप्रकाश पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या डाव्या बाजूला थेट गडग्यात घुसली.

या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने वाहनातील प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कार गडग्यातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी परस्पर सहकार्य करत प्रयत्न केले.

या मार्गावर उतार व वळण असल्याने तसेच सायंकाळच्या वेळी सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर पडत असल्याने वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *