Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूणची कन्या सिद्धी साळुंखे हिला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये कांस्यपदक

banner 468x60

राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान चालू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नेतृत्व करत रिकव्ह या धनुष्य प्रकारात सावर्डे येथे राहणार्‍या सिद्धी साळुंखे हिला सांघिक कांस्यपदक मिळाले.

या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 20 विद्यापीठाचे संघ आले होते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळामध्ये धनुर्विद्या खेळात पदक मिळवणारी रत्नागिरी जिल्ह्यातील?सिद्धी साळुंखे ही एकमेव खेळाडू आहे. यावर्षी भटिंडा पंजाब येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेत ती सहभागी झाली होती. तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले.


त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एकूण 53 मेडल्स आजपर्यंत मिळवली आहेत. शाळेच्या वेळी ती एसव्हीजे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे सराव करत होती. आता ती पुण्यातील ओंकार घाडगे यांच्या अकॅडमीमध्ये सराव करत आहे. दहा वर्षे ओंकार घाडगे?यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तिला मिळालेले आहे. या कालावधीत भारतीय संघाच्या कोचिंग कॅम्पमध्ये जागा मिळाली होती. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *