Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

रत्नागिरी : जिल्ह्यात आज सरासरी 108.33 मिमी पाऊस, खेड तालुक्यात सर्वाधिक 157.28 मिमी नोंद

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी (२९ जून) मुसळधार पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात आज एकूण 975.00 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा सरासरी पर्जन्यमान 108.33 मिमी इतका राहिला.

आजच्या पावसाच्या आकडेवारीनुसार खेड तालुक्यात सर्वाधिक 157.28 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ दापोलीमध्ये 130.57 मिमी आणि मंडणगडमध्ये 130.50 मिमी पाऊस झाला. चिपळूणमध्ये 115.77 मिमी, संगमेश्वरमध्ये 102.66 मिमी, गुहागरमध्ये 93.00 मिमी, लांजामध्ये 91.20 मिमी, रत्नागिरीमध्ये 77.77 मिमी आणि राजापूरमध्ये 76.25 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *