Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : बाजारात कर्नाटकी हापूस आंब्यांची आवक

banner 468x60

कोकणातील स्थानिक हापूस आंब्यांचा हंगाम सुरू असतानाच बाजारपेठेत कर्नाटकातून येणाऱ्या हापूस आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादक आणि ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

banner 728x90

दापोलीतील किरकोळ विक्रेते तसेच महामार्गालगतच्या स्टॉलवर सध्या कर्नाटकी हापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. हे आंबे आकाराने मोठे आणि दिसायला आकर्षक असल्याने ग्राहक त्याकडे वळत आहेत. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कोकणातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या हापूसच्या चवीला आणि सुगंधाला कर्नाटकी आंब्यांची सर येत नाही.

यंदा अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका स्थानिक आंबा उत्पादनाला बसल्याने उत्पादन काही प्रमाणात घटले आहे. त्यातच बाहेरील राज्यातील आंब्यांची वाढती आवक झाल्याने बाजारभावावरही परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, ग्राहकांनी खरेदी करताना स्थानिक आणि कर्नाटकी हापूस यातील फरक ओळखून योग्य निवड करावी, असे आवाहन आंबा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *