Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे अपघात, उभ्या कंटेनरला भरधाव टेम्पोची जोरदार धडक

banner 468x60

संगमेश्वर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने टेम्पो पलटी झाला आणि केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

banner 728x90

या भीषण अपघातात कोल्हापूर येथील चालक रितेश पाटील गंभीर जखमी झाला. धडकेनंतर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

स्थानिक नागरिक आणि पत्रकार मिलिंद चव्हाण यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, आरवली ते तळेकांटे या पट्ट्यात सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धोकादायक पट्ट्यात सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *