दापोली तालुक्यातील शिक्षणरत्न संस्था संचलित मॉडेल स्कूल, फणसू येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि भव्य स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत तसेच त्यांच्या हातात रंगीबेरंगी फुगे देऊन आनंददायी वातावरणात स्वागत केले.


या विशेष स्वागत उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. शाळेच्या परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी शिक्षकांनी विशेष नियोजन केले होते.


कार्यक्रमास केंद्रप्रमुख नामदेव फल्ले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण बेर्डे, मुख्याध्यापक सचिन पवार, शिक्षिका अनिता पालवे यांची उपस्थिती लाभली. तसेच पालकांमधून जान्हवी नरवणकर, योगेश विचले, रोहित विचले, गौरी पेठे, रेखा गोतावळे, यश्वी करंजकर, पल्लवी रहाटे, श्वेता मांडवकर आणि सुषमा खोपटकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता रहाटे होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













