दापोली : वस्तू देण्याचे आमिष दाखवून प्राचार्यांची 8.88 लाखांची फसवणूक

banner 468x60

दापोली सीनियर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धीरज अग्रवाल आणि विकास प्रभू या दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १६ सप्टेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित धीरज अग्रवाल आणि विकास प्रभू यांनी डॉ. जगदाळे यांना विविध वस्तू देण्याचे आमिष दाखवले.त्यासाठी त्यांनी डॉ. जगदाळे यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.

या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून डॉ. जगदाळे यांनी एकूण ८ लाख ८८ हजार ४२६ रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. मात्र, पैसे भरूनही डॉ. जगदाळे यांना कोणतेही सामान मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.दोन्ही संशयितांचा शोध घेतला जात आहे, आणि फसवणुकीमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *