चिपळूण : फिजा जलील खतिब हिचं नेट परीक्षेत यश

banner 468x60

चिपळूण येथे सहाय्यक प्राध्यापकपदासाठी यूजीसी नेट परीक्षेत फिजा जलील खतीब हिने यश संपादन केलं आहे. सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गोवळकोट येथील २३ वर्षीय फिजा खतीब हिने इंग्रजी साहित्य विषयात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत ९८.१४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

याआधी फिजाने ऑगस्टमध्ये एम सेट परीक्षेत यश मिळवलं होतं. हे तिचे दुसरे मोठे यश आहे. फिजा हिला साहित्यातील गाढा अभ्यास आणि अध्यापनाची आवड असून कठोर परिश्रम केल्याने हे यश संपादन केले आहे.

फिजा म्हटली “नियोजनबद्ध अभ्यासामुळे कठोर परिश्रम, शिक्षक व आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आले आहे. तसेच पुढे आपण पीएचडी करणार आहे”. या परीक्षेत ६ लाख ४९ हजार ४९० विद्यार्थी बसले होते,

त्यापैकी ४८ हजार १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल फक्त सहा टक्के लागला असून यात फिजा खतीब हिला यश मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *