चिपळूण दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबवल्याची घटना नुकतीच घडली.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद महादेव भिकाजी गुरव (५९, राजापूर) यांनी दिली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.५० च्या सुमारास महादेव गुरव हे त्याच्या पत्नीसह दिवा ते रत्नागिरी असा दिवा पॅसेंजर या रेल्वेगाडीतून प्रवास करत होते.
यावेळी खिडकीच्या वरील बाजूस महादेव गुरव यांनी त्यांच्या पत्नीची पर्स हुकला अडकवून ठेवली होती. मात्र प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने ही पर्स चोरुन नेली.
त्यामध्ये ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने होते. हा प्रकार सावर्डे रेल्वेस्थानकावर उघडकीस आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















