Breaking News
चिपळूण कोयता हल्ला प्रकरणी दोघांना अटक, चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई; सातपैकी दोघे ताब्यात, अब्दुल शेख आणि अमन शेख मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या हाती, अन्य पाच संशयित फरार, शोधमोहीम सुरू BIG BREAKING NEWS – चिपळूण हादरलं! भरदिवसा कोयत्याने सपासप वार मंडणगड : राज्यमंत्री योगेश कदम आज मंडणगड दौऱ्यावर, जलजीवन मिशनच्या कामांचा घेणार आढावा संगमेश्वर : कोंडगाव तिठ्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार

संगमेश्वर : हातीव फणस स्टॉप येथे आढळला मृत बिबट्या

banner 468x60

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील हातीव फणस स्टॉप येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. भुकेने अशक्त होऊन या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हा बिबट्या सुमारे एक ते दीड वर्षाचा होता. याबाबत ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

संगमेश्वर तालुक्यातील हातिव फणस स्टॉप येथे रस्त्याच्या बाजूला रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना बिबट्या निपचीत पडलेला दिसुन आला.

त्यानंतर याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.

पाहणी दरम्यान निपचित पडलेला बिबटा मृत असल्याची खात्री झाली. यावेळी साखरपा बिट वनरक्षक सहयोग कराडे, फणगुस बिट वनरक्षक आकाश कडुकर, आरवली बीट वनरक्षक सुरज तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केलाबिबट्या मृत असल्याची खात्री झाल्यानंतर पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याचे शवविच्छेदन केले.

यावेळी बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे दिसून आले. भक्ष्य मिळवियासाठी वन्यप्राण्यांशी झटापट करताना बिबट्याच्या अंगावर व्रण पडले आहेत. हा बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्षाचा होता.

रितसर कार्यवाही करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *