Breaking News
चिपळूण कोयता हल्ला प्रकरणी दोघांना अटक, चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई; सातपैकी दोघे ताब्यात, अब्दुल शेख आणि अमन शेख मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या हाती, अन्य पाच संशयित फरार, शोधमोहीम सुरू BIG BREAKING NEWS – चिपळूण हादरलं! भरदिवसा कोयत्याने सपासप वार मंडणगड : राज्यमंत्री योगेश कदम आज मंडणगड दौऱ्यावर, जलजीवन मिशनच्या कामांचा घेणार आढावा संगमेश्वर : कोंडगाव तिठ्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार

देवरुख : बालकाला ताप आला, उपचारांसाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू

banner 468x60

देवरूखमधील पाच महिन्यांच्या बालकाला ताप आल्याने त्याला उपचारांसाठी काेल्हापूर येथे नेत असतानाचा वाटेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ जानेवारी राेजी घडली.

मयूरेश जनू जांगळी (रा. मुर्शी – भेडींचा माळ, संगमेश्वर) असे बालकाचे नाव आहे.याबाबत त्याच्या आजाेबांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूरेश याला ताप आल्याने त्याला साखरपा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले हाेते. तेथील डाॅक्टरांनी तपासून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर त्याला रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्याला काेल्हापूर येथे नेण्यास सांगण्यात आले.त्याला १०८ रुग्णवाहिकेतून काेल्हापूर येथे नेत असतानाच त्याची प्रकृती बिघडली.

त्यामुळे रुग्णवाहिका पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी देवरूख पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *