Breaking News
संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी दापोली : उपजिल्हा रुग्णालयातील बंद पडलेली डायलिसिस सेवा पुन्हा सुरू, ऋषी गुजर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट

दाभोळ-दापोली रोडवर एसटी बस आणि बाईकचा भीषण अपघात, बाईक चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

दाभोळ-दापोली रोडवर एसटी बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.


या अपघातामध्ये तहसीन मतरोजी वय 35 राहणार दाभोळ वनकर मोहल्ला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

दाभोळ वरून दापोलीकडे जात असताना उंबर्ले येथील उतारातमध्ये एसटी बस आणि सुझुकी बर्गमेन बाईकचा भीषण अपघात झाला आहे. तहसीन मतरोजी यांच्यासोबत त्यांचे मामा शमशुद्दीन दांडेकर हे देखील होते त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांना दापोली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दापोलीवरून दाभोळला जाणारी ११ ची एसटी बस उंबर्ले येथे येताच समोरून येणाऱ्या बाईकचची धडक बसून अपघात झाला आहे.

एसटी बस चालकाचं नाव एस आर मोरे आहे.पोलीस पंचनामा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *