रत्नागिरी : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा नराधम बापानेच, सात महिन्यांच्या मुलीला उंचावरुन टाकले

banner 468x60

बाप नावाला कलंक लागावा अशी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या सात महिन्यांच्या मुलीला उचलून तिला खाली पाडून दुखापत केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथे मंगळवारी १३ ऑगस्टला रात्री घडली.

याप्रकरणी बापाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रवींद्र मुळ्ये (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी ७ महिन्यांच्या लहान मुलीसह मिरजोळे – आदर्शनगर येथे माहेरी काही दिवस राहण्यासाठी आली होती.

मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान पती सौरभ तिथे आला आणि झोपलेल्या मुलीला उठवून घ्यायला लागला. तेव्हा पत्नीने त्याला तिला उठवू नको झोपू दे, असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने सौरभ तिथून निघून गेला.

परंतु, रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पत्नीच्या माहेरी जाऊन मुलीला माझ्याकडे दे असे सांगितले. त्यावेळी पत्नीने मुलीला भरवते व त्यानंतर तुमच्याकडे देते, असे सांगितले. मात्र, ते न ऐकता पत्नीकडून मुलीला जबरदस्तीने घेऊन तिला वर उचलून धरले.

त्यावेळी मुलगी हातातून खाली पडली आणि तिच्या डोक्याला पाठीमागे मार लागून ती बेशुद्ध पडली. त्यानंतर पत्नीने मुलीला तत्काळ उचलले असता पती सौरभने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा कलम १२५ (अ), ११५ (२), ३५२, १३१ प्रमाणे साैरभ मुळ्ये याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *