Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : भावाचा बहिणीला मोबाइलवर व्हिडीओ कॉल, “मी ट्रेनखाली आत्महत्या करतोय”

banner 468x60

रत्नागिरीत धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला व्हिडीओ कॉल करून मी ट्रेनखाली आत्महत्या करत असल्याचे सांगून एका ३८ वर्षीय तरुणाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केली.

ही घटना रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सुरेंद्र राजेंद्र कीर (रा. मुरुगवाडा-पेठकिल्ला रोड, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे. सुरेंद्रला दारूचे व्यसन होते. तो गुरुवारी दुपारी शहराजवळील कुवारबाव येथील टीआरपीजवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर गेला होता.

तिथून त्याने बहिणीला मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला आणि मी ट्रेनखाली आत्महत्या करत आहे, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने पुलावरून रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले.

या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसाना याबाबत माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक निखार्गे, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रूपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले.

त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *