Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : आईने मुलाला कचरा टाकायला पाठवलं पण… वाकवली येथील साडेचार वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

banner 468x60

दापोलीमधील वाकवली नवानगर-गिरणगावात दुर्देवी घटना समोर आली आहे. नदीत बुडून साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना शुक्रवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून सिरजल कमल भुजल असं मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद गणेश भुजल यांनी दापोली पोलीस स्टेशनला दिली आहे. वाकवली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गणेश भूजल नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दरम्यान 8 वाजता त्यांच्या पत्नीने कॉलकरून आपला मुलगा सिरजल नदीच्या पाण्यात पडल्याची माहिती दिली.

यानंतर कमल हे घरी परत येऊन तातडीने मुलाला खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र सिरजली प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी आपल्याच गाडीतून सिरजलला दापोली उपजिल्हा रूग्णालयात नेले.

कमल यांच्या पत्नीने मुलगा सिरजल याला कचरा टाकण्याकरिता पाठवले होते. तो बराच वेळ आला नाही म्हणून पत्नीने आरडाओरडा केला असता गावातील माजी पोलीस पाटील गणपत आंबेकर, मनोज कोळेकर यांची पत्नी आणि अनिता मोहिते यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध सुरू असताना मुलगा घराजवळील नदीच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.

ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून 9:30 वाजण्याच्या सुमारास सिरजल मृत झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *