Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : घाटगे कुटुंबाला खेड पोलीस न्याय कधी देणार ? सचिन घाटगे अपघाताच्या फेरतपासाचे आदेश, हायकोर्टाचा खेड पोलिसांना झटका, पोलीस तपास दिशाभूल करणारा ?

banner 468x60

खेडमध्ये सचिन घाटगे यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी बुद्रुकनजीक 4 वर्षापूर्वी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला होता.

मात्र गेल्या चार वर्षांपासून पोलीस तपास हा दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीवरील तरुणाला पोलिसांनी अपघातास जबाबदार धरले होते. त्यामुळे सचिन घाटगे यांना न्याय मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

या सर्व प्रकरणी खेड पोलिसांनी दुर्लक्ष केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अपघाताच्या फेरतपासनीचे आदेश देत पोलिसांना फटकारले आहे. दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असतानाही अहवाल आणि तपास हा योग्य न केल्याचा ठपका हायकोर्टाने ठेवला आहे.

दरम्यान खेड पोलिसांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार केला आहे तर नवीन तपासात खेड पोलीस न्यायाच्या बाजूने उभे राहणार का सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करून सत्य माहिती आणि आरोपीला शिक्षा देणार का याकडे घाटगे कुटुंबीयांचा लक्ष आहे.

प्रकरणी 4 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास न करणाऱ्या पोलिसांवर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. दुचाकीस्वार तरुण ट्रकखाली चिरडल्याचे सीसीटीव्हीत दिसत असतानाही पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केले.

याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फेर तपासाचा आदेश दिला. याप्रकरणी 4 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. मात्र या सर्व प्रकरणामागे कोण आहे पोलीस असा चुकीचा अहवाल का देत आहेत निपक्ष तपास का केला जात नाही असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
कळंबणी बुद्रुकजवळ 12 सप्टेंबर 2020 रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन घाटगेचा मृत्यू झाला होता. सचिनची आई आशा घाटगे यांनी वकील . रेश्मा मुठा, वकील. सुयोग वेसवीकर आणि वकील .

संदीप आग्रे यांच्यामार्फत हायकोर्टात दाद मागितली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सचिनने हेल्मेट परिधान केले नव्हते आणि तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. अपघाताला तोच जबाबदार होता, असा आरोप पोलिसांनी केला.

त्यावर आशा घाटगे यांच्यातर्फे वकील . रेश्मा मुठा यांनी आक्षेप घेत आरोपांचे खंडन केले. त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतली आहे.

कोर्टाने फटकारताच पोलीस खडबडून जागे

न्यायालयाने फटकारताच खेड पोलीस खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार करीत अपघाताच्या फेरतपासाची तयारी दर्शवली आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करू तसेच साक्षीदारांचे जबाब नव्याने नोंदवू, अशी हमी खेड पोलिसांनी दिली आहे.

पोलीस तपास दिशाभूल करणारा, वकील रेश्मा मुठा यांचा सवाल

दुचाकीस्वार सचिन भरधाव वेगाने ट्रकवर धडकल्याचा पोलिसांनी केलेला दावा चुकीचा आहे. पोलीस तपास दिशाभूल करणारा आहे. सचिन योग्य मार्गिकेवरून आणि कमी वेगाने दुचाकी चालवत होता.

यादरम्यान ट्रकचालक पार्किंग लाईट चालू न करता ट्रक मागे घेत होता. ट्रकचालकाच्या चुकीनेच सचिनचा जीव घेतला. ‘हॅप्पी ढाबा’च्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी सचिनला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद वकील रेश्मा मुठा यांनी केला आहे .

दरम्यान या सर्व प्रकरणी घाटगे कुटुंबाला खेड पोलीस न्याय देणार का जर पोलिसांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार केला आहे तर नवीन तपासात खेड पोलीस न्यायाच्या बाजूने उभे राहणार का सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करून आरोपीला शिक्षा देणार का हे पाहावं लागेल.

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *