दाभोळ : मिरवणूक काढल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

दाभोळ कोळथरे येथे मिरवणूक बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली.

banner 728x90 banner 728x90

कोळथरे येथील कब्रस्तान ते मुस्लिम मोहल्ल्यातून समुद्राकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्याकडे दाभोळ-कोळथरे येथील शिवजयंती व शिमगोत्सव मिरवणुकीबाबत १५ फेब्रुवारी रोजी पत्र दिले होते.

तरीही लोकसेवक म्हणून मिरवणूक काढण्याकामी दिलेल्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा करून सामाजिक शांतता धोक्यात आणून गुन्ह्याचे कृत्य केले म्हणून दिलीप दत्तात्रय संकुलकर, रविंद्र महादेव आडविलकर, संदीप रघुनाथ झगडे, योगेश दत्तात्रय संकुलकर, रमेश गणपत कणगुटकर, उज्वल कृष्णनाथ हेदुकर, शैलेश शांताराम संकुलकर (सर्व रा. कोळथरे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची फिर्याद दाभोळ सागरी पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक संजय धोपट यांनी दिली. या प्रकरणी दाभोळ पोलिस अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *