चिपळूण : वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळले

banner 468x60

चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. दसपटी विभागात कादवड येथील वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत.

banner 728x90 banner 728x90


या मुलींचा घातपात झाला की आणखी काही याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाली राजेंद्र निकम (वय 14) आणि मधुरा लवेश जाधव (वय 14 रा. कादवड) या मोहन विद्यालय आकले शाळेच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आहेत. त्यांचे मृतदेह नदी लगत सापडल्याने दसपटी विभागात एकच खळबळ उडाली आहे.


आदिवासी समाजातील गरीब कुटुंबातील मुली असून त्यांच्या
मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. आज (दि. 16) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कादवड वैतरणा नदीतील एका डोहाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले.

यानंतर तेथील ग्रामस्थांनी शिरगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस दाखल होताच त्यांनी तात्काळ दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेह आणले. दादर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *