Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

banner 468x60

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. यादौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.

 या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेअसून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.

 हा झंझावात रत्नागिरीजिह्यात धडकणार आहे. आज गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवादहोणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. 

त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथीलआझाद मैदानावर जनसंवाद होणार आहे. त्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्तेहोणार आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गिते, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदमउपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *