राज्यात युतीचं सरकार जरी असेल तरी सर्वच ठिकाणी आलबेल आहे असं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोली दौऱ्यावर असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली.
दापोली झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपविरुद्धची नाराजी बोलून दाखवली.
“कोण तो रवींद्र चव्हाण” असं बोलत भाजपविरुद्ध भूमिका मांडली. याला भाजपच्या नेत्यांनीही उत्तर दिलं. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाअधक्ष्य केदार साठे यांनी फेसबुक पोस्ट लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली.
फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करू नये. फांदी तुटली तर राम राम करण्याची वेळ येईल, अशा आशयाचे स्टेटस दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाहायला मिळाले. त्यामुळे दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख नेमका कुणाकडे ? अशी चर्चा दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी सुरू होती.
यानंतर आता मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कामाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दापोली भाजपने आता थेट कॅम्पिंनिग करुन रामदास कदम यांना उत्तर दिलं आहे.
“तो कोकणचा सुपुत्र रविदादा चव्हाण” असं म्हणत कॅम्पिंनिगच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलंय. मात्र येणाऱ्या निवडणुकीत दापोलीत भाजप आणि शिवसेना अशी वादाची ठिणगी पडली आहे.
सुनील तटकरे यांचे रायगड लोकसभा उमेदवारीबाबत देखील वर खाली असल्याने ती बाजू माजी मंत्री रामदास कदम यांनी उचलून धरली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी जवळीक वाढताना दिसत आहे.
मात्र, भाजपचे दापोलीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी नाराज होताना दिसत आहेत. त्यामुळे दापोलीत या नाराजीचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















