दाभोळ : कन्या शाळेचं काम पूर्णत्वास ठाकरे गटाकडून पालक आणि ग्रामस्थांचा सन्मान

banner 468x60

दाभोळ गावातील कन्या शाळेचं काम पूर्ण झालं असून पालक आणि ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे झालेल्या कामाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

ठाकरे गट दाभोळ शाखेच्यावतीने शालेय समिती, आणि ग्रामस्थ , पालक यांचा यावेळी सत्कार  करण्यात आला.

गेल्या अनेक महिन्यांपासून दाभोळ कन्या शाळा प्रकरण प्रतिष्ठेचा समजला गेला होता. अखेर पालक आणि ग्रामस्थांमुळे या शाळेचं काम पूर्ण झालं आहे. 


दाभोळ गावातील कन्याशाळा छप्पर दुरुस्ती करण्यासाठी पालक आणि  ग्रामस्थांच्या मदतीने ठेकेदाराला मदत  करुन केवळ २ दिवसात  शाळेचं काम पूर्ण झालं आहे.


याच अनुषंगाने शालेय समिती, ग्रामस्थ व पालक यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम दाभोळ येथील सागरपुत्र सभागृहात पार पडला.

यावेळी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट देण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी मुरलीधर कनगुटकर, शहर संघटक नाना शिगवण, युवा अधिकारी नाना दूदवडकर, शाखाप्रमुख महेश खोत,

शिवआरोग्य सेना महिला विभागप्रमुख ऋषाली मुरकर, उपशाखाप्रमुख चंद्रकांत खळे, गणेश कर्देकर, रमेश जाधव,

ज्येष्ठ शिवसैनिक संदेश तोडणकर व मागाठाणे विधानसभा समन्वयक चित्तरंजन देवकर उपस्थित होते. दाभोळमधील पालकवर्ग आणि ग्रामस्थांची विशेष उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *