मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 मार्च ला दापोलीत

banner 468x60

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.९ रोजी दापोली मतदार संघामध्ये सुमारे ४०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार असून, त्यानंतर जाहीर सभा होणार असल्याची माहिती दापोली- खेड-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी बुधवारी (दि. ६) रोजी जामगे येथील निवासस्थानी सायंकाळी ५ वा. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

banner 728x90 banner 728x90

यावेळी आ. कदम म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदारसंघातील ज्या प्रमुख काही महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती.

त्यापैकी ऐतिहासिक वारसा असलेले, महत्त्वाचे असलेले हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी २०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात १०० खाटांचे नवीन रुग्णालय ज्यामध्ये अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील. त्यासाठी २० कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, याकोण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

दापोलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळकाई देवस्थानच्या जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली होती. दापोलीतील या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. ९ रोजी होणार आहे.

या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते रामदास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे आ. योगेश कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *