दापोली : विनयभंग करून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

banner 468x60

दापोली तालुक्यात विनयभंग करून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे .

banner 728x90 banner 728x90

यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बकऱ्या चरवण्यासाठी जंगलात गेली असताना त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संशयीत स्वरूप मोरे याने केला.

पीडित महिला ही जंगलमय भागात बकऱ्या घेऊन गेली होती. त्यावेळी स्वरूप मोरे याने वाईट हेतूने पीडित महिलेचा हात धरून, तोंड दाबत तिला ओढत जंगलात नेले. यावेळी पीडित महिलेने विरोध केला असता त्याने तिला दगडावर आपटून दगडाने मारून जखमी केले.

जवळ असलेल्या लायटरने पीडित महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिची साडी पेटवली. यात ती महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महिलेच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच पायाला भाजून जखम झाली आहे.
या प्रकरणी स्वरूप मोरे याच्यावर भादंविकलम 307, 354, 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक जे. एच. चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *