Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळुण : राड्याप्रकरणी 12 जणांना अटक, 8 जणांना न्यायालयीन कोठडी

banner 468x60

चिपळुणातील राणे आणि जाधव समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी चिपळूण पाेलिसांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणखी नऊजणांना अटक केली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून, ८ जणांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित चारजणांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी जाेरदार राडा झाला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. पोलिस हवालदार प्रशांत वामन चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पाेलिसांनी दाेन्ही गटांतील तब्बल ४०० जणांवर गुन्हे दाखल केले असून,

अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. या राड्याप्रकरणी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक केली हाेती. त्यांना आधीच न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. तर रविवारी सकाळी राम डिगे, संजय भुवड, सुनील तांबडे, संजय गोताड,

राजू गायकवाड यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच सायंकाळी प्रभाकर जाधव, प्रकाश जाधव, दिलीप साबळे, विक्रम साळुंखे या चाैघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांना नाेटीस दरम्यान, शुक्रवारी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या.

चिपळूण भाजपचे तालुकाप्रमुख वसंत ताह्मणकर व परिमल भोसले या पदाधिकाऱ्यांना या नोटीस देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *