Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, सभेपूर्वीच वातावरण तापलं

banner 468x60

माजी खासदार निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये काहीवेळात सभा होणार आहे. या सभेसाठी ते चिपळूणमध्ये दाखल होताच त्यांच्या गाडीवर दगडफेक झालीय.


निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

मात्र चिपळूणमध्ये आल्यावर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झालीय. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दोन्हीकडून दगडफेक सुरू झाल्याची माहिती समोरयेतेय. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

निलेश राणेंच्या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत.

भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील 11 वर्षापासूनचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून हा अद्यापही कायम आहे. निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे.

भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात निलेश राणेंची जाहिर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. भास्कर जाधवांनी राणे पिता-पुत्रांवर  टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी जाहिर सभा आयोजित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *