Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : पद्मश्री दादा इदाते यांचा कर्नाटकात होणार “बसवा” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

banner 468x60

दापोली : पद्मश्री दादा इदाते यांना जगज्योती बसवेश्वरा यांच्या नावाने ‘बसवा राष्ट्रीय पुरस्कार (2020-2021)’ प्रदान करण्यात येत आहे.

भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये सामाजिक सुधारणा, परिवर्तन आणि सामाजिक न्याय यातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. ‘राष्ट्रीय बसवा पुरस्कार’ हा कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

10 लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या हस्ते 31.01.2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता रविद्र कलाक्षेत्र, जे.सी. रोड, बंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित ‘विविधता प्रशंसा समारंभ’ कार्यक्रमात ‘बसवा राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमात मागासवर्गीय कल्याण आणि कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. दादा इदातेंचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *