चिपळूण : सदनिका फोडणार्‍या चोरट्याला 2 तासात अटक

banner 468x60

चोरट्याने बंद सदनिका फोडून त्यातून तब्बल ३ लाख ३ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवल्याची घटना ९ रोजी खेर्डी बाजारपेठ येथील अनंत साई आपर्टमेंटमध्ये घडली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत सराईत असलेल्या चोरट्याला त्याच्या राहत्या घरातून अवघ्या दोन तासात अटक केली. त्याने चोरलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला असून, या चोरट्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

पवन जयंत आंबेडे (२८, वालोटी- आंबेडेवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत साई अपार्टमेंटमधील एका बंद सदनिकेत घुसून पवन आंबेडे याने कपाटाचे लॉकर उचकटले.

आतील स्टीलच्या छोट्या पेटीतील २ लाख ८७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम १६ हजार रुपये, असा ३ लाख ३ हजाराचा ऐवज चोरून नेला.


हा प्रकार सदनिका मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली. या चोरीच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी पवन आंबेडे याने केल्याचे स्पष्ट होताच त्याचा शोध घेण्यात आला.

तो तालुक्यातील वालोटी येथे राहत असल्याचे समजल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याने चोरलेल्या दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

आंबेडे हा सराईत चोरटा असून, यापूर्वीही पिंपळी येथे झालेल्या चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *