Breaking News
दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल खेडच्या पुरे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर खेड : दहिवलीनंतर गोटलवाडीवर भूस्खलनाचे सावट, डोंगराला दीड-दोन किमीपर्यंत मोठ्या भेगा खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट धोक्याच्या उंबरठ्यावर; रस्त्याला मोठ्या भेगा दापोली : हर्णे राणेवाडी रस्ता खचला, वाहतुकीला मोठा धोका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

दापोली : भोमडी येथे सापडले 7 जिवंत गावठी बॉम्ब

banner 468x60

तालुक्यामधील भोमडी येथे फुगीची नदी या ठिकाणी जंगलमय भागात ७ जिवंत गावठी बॉम्ब सापडले.

हे गावठी बॉम्ब प्राण्यांच्या शिकारीकरिता लावलेले होते की, अन्य काही उद्देश होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

banner 728x90

दापोली : भोमडी येथे सापडले 7 जिवंत गावठी बॉम्बभोमडी-निकमवाडी येथे राहणारे संतोष काणेकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने जिवंत गावठी बॉम्ब रस्त्यात पेरून ठेवलेले होते.

हे बॉम्ब जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बॉम्बची किंमत सुमारे ७ हजार असून, अज्ञात इसमाच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकारीचे पेव फुटले असून अशा पद्धतीने बॉम्बचा वापर करून जंगली प्राण्यांची शिकार केली जात आहे. या जिवंत गावठी बॉम्बमुळे पाळीव जनावरे तसेच मनुष्यहानीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *