Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : वांद्रीत अंगावर गरम पाणी पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे अंगावर उकळते पाणी पडून उपचारादरम्यान तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ओवी किंजळे असे या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. संंगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवी त्यांच्या शेजारी राहणार्‍या आरती किंजळे हिच्या घरी खेळायला गेली होती.

त्यांच्या येथे गरम पाणी ओवी हिच्या अंगावर पडल्याने ती भाजली होती. तिला तात्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक औषध उपचार करून घरी सोडण्यात आले.

त्यानंतर तिची तब्येत जास्त बिघडल्याने तिला रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यास सांगितले.

मात्र सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे राजेश शेलार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *