Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

राजापूर : लोणवीवाडी येथे सापडला मृत बिबट्या

banner 468x60

नवेदर लोणवीवाडी येथे सुगंधा सदाशिव बावकर यांच्या राहत्या घरा लगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली मरण पावलेला बिबट्या काल रात्री आढळून आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित बिबट्याचा उपासमारीने सुमारे तीन – चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत वन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोनवीवाडी येथील सुगंधा सदाशिव बावकर यांचे राहते घराच्या भिंतीलगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली बिबट्याचा बछडा मृत झाल्याची माहिती पोलीस पाटीलांमार्फत राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे आणि सहकारयांना मिळाली.

त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी मृत बिबट्याच्या बछड्यास ताब्यात घेवून राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेतली.

सदर बिबट्याचा मृत्यू हा उपासमारीने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाल्याने त्याचे शरीर कुजलेले अवस्थेत दिसून आल्याने त्याचे सहाय्यक वनसंरक्षक यांचे समक्ष जागेवर दहन करण्यात आले.

यावेळी राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यु टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये, वसंत पाटील, नवेदरचे पोलीस पाटील श्री. भोवड आदी उपस्थित होते. दरम्यान, आसपासच्या परिसराचा शोध घेवून अवैध बाबी काही आढळून येत आहेत का ?

याचा तपास वन विभागाकडून सुरु करण्यात आला आहे. हा तपास विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांचच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *